उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर नाना पटोले म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत महायुती…’

Nana Patole । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यातच ठाकरे गटाचा मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
“राज्यात आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल,” असा विश्वास यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारमध्ये निश्चितच बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही त्यांनी चर्चा केली.
उद्धव ठाकरे काँग्रेस नेतृत्वाची भेट घेणार Nana Patole ।
एका वृत्तसंस्थेनुसार, “शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख ठाकरे यांच्या मंगळवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर पटोले म्हणाले, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय राजधानीत काँग्रेस नेतृत्वाची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीला कसे पराभूत करायचे, या रणनीतीवर ते चर्चा करतील.अशी माहिती दिली.
राज्याच्या जागावाटपाची चर्चा मुंबईत होणार Nana Patole ।
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष पुढे म्हणाले, “राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतील.” काँग्रेस नेत्याने सांगितले की, काँग्रेस, शिवसेना( ठाकरे गट) आणि एनसीपी (एसपी) या विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) साठी जागावाटपावर चर्चा दिल्लीत होणार नाही. यावर मुंबईत चर्चा होणार आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना पटोले म्हणाले, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत व्हीपचे उल्लंघन करून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांना माफ केले जाणार नाही.
गेल्या महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होट केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने लोकप्रिय योजना जाहीर करत असल्याची टीका पटोले यांनी केली.
ते म्हणाले, “काही करदाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत आणि सरकार एमव्हीएला दोष देत आहे. लाडकी बहिन योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतील. महाराष्ट्रात या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
“आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार, पण आधी..”; रावसाहेब दानवेंच मोठं विधान





