BJP Yuva : 29 युवा मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा! भाजपने ‘या’ चेहऱ्यावर सोपवली मोठी जबाबदारी
BJP Yuva : युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत एकूण २९ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, विशेष म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे.

Announcement of the names of 29 Yuva Morcha state office-bearers : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर विविध बदलांना वेग आला आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि भाजपा महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाविक यांनी युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत एकूण २९ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, विशेष म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. या नियुक्त्यांमध्ये शंभवी साळे यांच्याकडे युवती प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शंभवी साळे यांची नांदेड युवती प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने राज्यातील युवती संघटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात भाजपच्या युवती संघटनेचे नेटवर्क राज्यभर विस्तारण्याचे मोठे आव्हान शंभवी साळे यांच्यासमोर असणार आहे.
युवा नेतृत्वातून राष्ट्रनिर्माणाकडे…
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सर्व नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत भाजपा युवा मोर्चाचे संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास आहे.
#BJYM #BJPFamily #BJP4Maharashtra #RavindraChavan
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) October 5, 2026
दरम्यान, युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची ही २९ जणांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाला संघटनेशी जोडण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पोस्ट