The Accidental Cockroach Party : नाव अन् बजेटही ठरलं पण…; कॅाक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सिनेमा येणार, कुणी केली घोषणा?
The Accidental Cockroach Party : आता विद्यार्थी आंदोलन मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

The Accidental Cockroach Party : नीट पेपरफुटी प्रकरणी सोशल मीडियावर उद्यास आलेली आणि त्यानंतर थेट मैदानावर उतरून आपल्या मागण्या मांडणारी ‘क्रॅाकोच जनता पार्टी’ची देशभरात चर्चा झाली. दिल्लीत जंतर मंतर येथे या पार्टीच्या वतीने व्यवस्थेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात देशभरातील विविध भागातील हजारोंच्या संख्येने तरुण जंतर मंतर येथे दाखल झाले.
या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधल्या अभिजीत दिपके या तरुणाला राजकीय नेत्यांपासून मनोरंजनविश्वासह अनेक क्षेत्रातील लोकांनी पाठिंबा दर्शवला होता. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. आता विद्यार्थी आंदोलन मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
गोविंद देव ब्रह्म यांनी केली घोषणा
या आंदोलनावर भाष्य करणारा आणि पडद्यामागच्या गोष्टी समोर आणणाऱ्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं नावही ठरलं असून ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ या नावाने हा सिनेमा रिलीज केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. या सिनेमाची घोषणा जयपूरचे रहिवासी असलेल्या गोविंद देव ब्रह्म यांनी केली आहे.
‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ हे शीर्षक
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमा या आंदोलनाशी संबंधित अशा अनेक धक्कादायक आणि पडद्यामागील गोष्टी उघड करेल, ज्या यापूर्वी लोकांपासून लपलेल्या होत्या. त्यामुळे या सिनेमाचे नाव घोषित झाल्यानंतर विविध चर्चा रंगल्या आहेत. निर्मात्यांनी या प्रकल्पासाठी ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ हे शीर्षक अधिकृतपणे नोंदवलं आहे.
२० कोटींचं बजेट
प्राथमिक माहितीनुसार, ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ सिनेमाचं बजेट २० कोटी रुपये आहे. गोविंद देव ब्रह्म यांच्या देखरेखीत सिनेमाच्या कथेवर काम सुरू करण्यात आलं असून ते अंतिम टप्प्यात आहे. अशातच या सिनेमात कॅाक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भूमिका कोण साकारणार? याविषयी चर्चा रंगली आहे.
या दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता
खरतंर या आंदोलनाची व्याप्ती खूप मोठी होती. सिनेमाचं बजेट केवळ २० कोटी असल्याने आंदोलनाची गोष्ट कशा पद्धतीने दाखवली जाणार हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. याशिवाय सिनेमाच्या इतर कास्टबाबातही विविध चर्चा रंगल्या आहेत. मुंबईतील बड्या बॉलिवूड सिनेनिर्मात्यांशी सुरू असलेल्या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
Kiara Advani: आलियाची झाली कियारा! ‘एमएस धोनी’पासून सुरू झाला कियारा अडवाणीचा सुपरहिट प्रवास





