“भगवानबाबांना कोणाच्या राजकीय अस्तित्वाची गरज नाही”; महंत नामदेव शास्त्रींची महत्वाची प्रतिक्रिया

Namdev Shastri on on Pankaja Munde । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भगवान गडावर तुफान गर्दी केली आहे. भगवान गडावर समर्थकांच्या हाती गोपीनाथ मुंडेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. तर गडावरील भगवान बाबांच्या आकर्षक मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबाबत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान , भगवान गडावरील आजच्या भाषणात ओबीसी आणि मराठा संघर्षावर भाष्य करणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडाच्या दसऱ्या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरु केलेली नाही.
गेल्या 10 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर भगवान गडावर होणारा दसरा मेळावा हा मी बंद केला. त्यांच्या वादामुळे भगवान गडावरचा मेळावा बंद झालेला नाही. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्याचा वयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला अशी प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी दिली आहे.
हेही वाचा
गोपीनाथ मुंडेंचे फोटो हाती घेत समर्थकांची पकंजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला तुफान गर्दी





