…प्रेयसीकडे सतत मागायचा नग्न फोटो, नकार देताच केलं घृणास्पद कृत्य

पुणे – प्रियकर सतत नग्न फोटोंची मागणी करत असल्याने प्रेयसीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. मात्र याचा राग मनात धरून प्रियकराने पीडितेचे अगोदर काढलेले नग्न फोटो मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईकांना व्हॉटसअप आणि इन्टाग्रामवर पाठवून बदनामी केली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी क्षिरसागर (22,रा.औरंगाबाद ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय पीडीत तरुणीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी एका खासगी कंपनीत काम करते, तर आरोपीही एका खासगी कंपनीत काम करतो. त्या दोघांची ओळख मित्रांमार्फत झाली होती.
ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीमध्ये झाले. यानंतर त्याने नग्न अवस्थेत फोटो काढले होते. मात्र आरोपी सातत्याने पिडीतेकडे नग्न फोटोंची मागण करत होता. याला वैतागून तीने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक करुन टाकला. याचा राग येऊन आरोपीने त्याच्या जवळ असलेले पिडीतेचे नग्न फोटो तीच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना मोबाईलवर पाठवून बदनामी केली. याप्रकरणाचा तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.





