तो एक फोन अन् पोलिसांना निलेश चव्हाणचा ट्रेस लागला; अटके आधी नेमकं काय घडलं?

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली असून त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. १० दिवसांपासून निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला ३० मे रोजी मध्यरात्री नेपाळ सीमेवरून पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यानच्या काळात त्याने पुणे टू नेपाळ असा प्रवास केला. दोन दिवस त्याने नेपाळमध्ये मुक्काम केला. प्रवासवेळी त्याने वेगवेगळे मोबाईल्स आणि वेगवेगळे सिमकार्ड़्स वापरले. मात्र, पोलिसांना त्याची लोकेशन कुणामुळे मिळू शकली याची माहिती आता समोर आली आहे.
निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाल्यानंतर त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. आपण फिरायला जाऊ असे त्याने तिला सांगितलं होतं. तसेच तिला सोबत ठेवून फोनचाही वापर केला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांचे पथके त्याच्या मागावर होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेची तपासणी केली. पोलिसांचे एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होते. त्या व्यक्तीला निलेशने मैत्रीणीच्या मोबाईलवरून संपर्क साधला आणि इथेच तो पोलिसांच्या जाळ्यात फसला. पोलिसांना त्याच्या मैत्रीणीचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला नेपाळ सीमेवरून अटक केली.
कॅाल रेकार्डिंमधून धक्कादायक माहिती येण्याची शक्यता
बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणच्या कर्वेनगर येथील घराची झाडाझडती घेतली. तपासात पोलिसांनी शशांक, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचे मोबाईल जप्त केले आहेत. तसेच काही इलेक्ट्रॉनिक गॅजेटदेखील बावधन पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. निलेश चव्हाणच्या मोबाईचे कॅाल रेकार्डची तपासणी देखील पोलिस करणार आहेत. कॅाल रेकार्डिंमधून धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
असा केला प्रवास
दहा दिवसांत निलेश चव्हाण याने पुण्यापासून नेपाळपर्यंत प्रवास केला.
या प्रवासासाठी त्याने खाजगी वाहनांचा वापर केला.
दोन- तीन मोबाईल फोन आणि पाच-सहा सिम कार्ड्स त्याने बाळगले होते.
पुण्यातून नेपाळपर्यंत पोहचण्यासाठी त्याने नवी मुंबई, मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, गोरखपूर, सोनोली उत्तर प्रदेश भैरवा नेपाळ आणि काठमांडू (नेपाळ) असा प्रवास केला.
२६ मे ते ३० मेपर्यंत त्याने काठमांडूत मुक्काम केला. ३० मे रोजी त्याला नेपाळच्या सोनोली सीमेवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि गुंडा स्कॉडने ताब्यात घेतले.
हेही वाचा: “आमच्या मित्र देशांना वाटत नाही कि आम्ही भिकेला लागावं” ; शाहबाज शरीफ यांची मोठी कबुली





