नागपुर हिंसाचार पूर्वनियोजित, पोलिस यंत्रणा ठरली अपयशी; सत्यशोधन समितीच्या अहवालाचा दावा
Updated On:

Nagpur Violance | नागपुर हिंसाचाराप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय विचार मंच आणि नागरिकांच्या सत्यशोधन समितीने त्यांच्या अहवालात नागपुरात झालेले हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे गंभीर आरोप केले आहे. तसेच हिंसाचार थांबवण्यात आणि हिंसा घडवणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यात नागपूर पोलिसांच्या क्षमतेवरही गंभीर आरोप या अहवालातून ठेवण्यात आले आहे. Nagpur Violance |
सत्यशोधन समिती अहवाल
- कबरीची प्रतिकृती आणि हिरव्या कापडाची जाळपोळ हे केवळ एक निमित्त होते. दंगलीस इतरही गोष्टी कारणीभूत होत्या. देशात मागील काही काळात घडलेल्या घटनाक्रमावर मुस्लिम समाजात पसरविण्यात आलेले गैरसमज मोठ्या प्रमाणात या घटनेला हातभार लावून गेल्याचे समितीला आढळून आले.
- हिंदू समाजाला लक्ष्य करण्यासाठी हा दंगा करण्यात आला. कायद्याचे राज्य उद्ध्वस्त करणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि पोलिसांना हतबल करण्याचा जमावाचा हेतू होता.
- दंगलग्रस्त वस्त्यांमधील अनेक घरांमध्ये महिला एकट्याच होत्या. अशावेळी घरांवर दगडफेक करून घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. इस्लामच्या नावे घोषणाबाजी करून महिलांमध्ये पद्धतशीर दहशत पसरविण्याचा कट यामागे होता.
- हिंसाचार घडलेल्या आणि संवेदनशील वस्त्यांच्या लगतच्या रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव ही समोर आले आहे.
- नागपुरात झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. हिंसाचार झालेल्या भागात एरवी विशिष्ट समुदायातील व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य आणि शेकडो वाहन रात्री उशिरापर्यंत फुटपाथ वर असायचे. मात्र हिंसाचाराच्या दिवशी ते दुपारीच त्या ठिकाणातून हटवण्यात आले होते.
- दुसऱ्या धार्मिक समुदायाला लक्ष करण्यासाठीच हिंसाचार करण्यात आला. त्यामागे कायद्याचे राज्य उध्वस्त करणे आणि त्यासाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करणे, असं उद्दिष्ट होते. यात 35 ते 40 पोलीस अधिकारी व कर्मचारी या हिंसाचारात जखमी झाले.
- पोलिसांना जमाव एकत्र येत असल्याची कल्पना आली, त्यावेळी तो जमू न देण्याच्या तात्काळ उपाययोजना झाल्या नाहीत. काही मशिदींमध्ये नेहमीपेक्षा बरेच जास्त लोक विशेषतः तरुण आणि अल्पवयीन मुले जमली असल्याचे लक्षात आले.
- जमावाकडून एका समुदायाच्या घरांना, वाहनांना टार्गेट करून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. अल्पसंख्याक समाजाच्या संवेदनशील वस्त्यांमध्ये घटनेच्या दिवशी सकाळपासून घडत असलेल्या घडामोडींची पुरेशी कल्पना पोलिसांना आली नाही. परिस्थितीचा नेमका अंदाज घेण्यात पोलिसांची गुप्तहेर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली.
- हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना केवल लाठीमाराचे म्हणजेच मर्यादित बळाचा वापर करण्याचे आदेश होते, असेही अनेक पोलिसांनी मान्य केल्याचे सत्यशोधन समितीच्या अहवालात म्हटले आहे.
- हिंसक जमावाला हाताळण्यासाठी आणि त्यांच्यापासून स्वतःच्या बचावासाठी सुरुवातीला पोलीस यंत्रणेकडे पुरेशा प्रमाणात साधनसामग्री नव्हती. शिल्ड, हेल्मेट अशा गोष्टी नसल्यामुळे काही नागरिकांनी पोलिसांना आपल्याकडील साधी हेल्मेट पुरवल्याचे उदाहरणही सत्यशोधन समितीला दिसून आले आहे.
- संकटग्रस्त वस्त्यांमधील नागरिकांनी त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्ष स्थानिक पोलीस ठाणे आणि पोलीस अधिकाऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर फोन केले. मात्र पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं आरोप अनेक पीडित नागरिकांनी सत्यशोधन समिती समोर केले.
दरम्यान, नागपूर शहराच्या महाल परिसरात 17 मार्च रोजी दोन गटात झालेल्या तूफान राडा आणि दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. महाल परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शेकडो लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य आरोपी फिहम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
हेही वाचा :





