Nagpur Fire Accident | नागपूरात राजकमल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; २ जणांचा मृत्यू

Nagpur Fire Accident | नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट येथील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाला आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या यावेळी बोलावण्यात आल्या होत्या. त्यांच्या मदतीने आगीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळाले आहे.
दरम्यान, आगीमुळे परिसरात दहशत पसरली असून, फॅन्सी फटाके, सिरीज हॅलोजन लाइट्स आणि इलेक्ट्रिक साहित्याचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले. या भीषण आगीत गिरीष खत्री आणि विठ्ठल धोंडे यांचा मृत्यू झाला, तर गुणवंत नागपूरकर आणि ऐश्वर्या त्रिवेदी गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली होती. Nagpur Fire Accident |
दरम्यान, आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावरील ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला असून, तपास सुरू आहे. Nagpur Fire Accident |
हेही वाचा :
अहमदाबाद विमान अपघाताच्या प्रश्नावरील ‘त्या’ कृतीमुळे अभिनेत्री ट्रोल; पोस्ट करत दिले स्पष्टीकरण





