College admission : आधी मतदार नोंदणी नंतर महाविद्यालयात प्रवेश

नागपूर :- तरुण मतदारांची नोंदणी वाढण्याच्या दिशेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवा फंडा आणला आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याआधी आता मतदार नोंदणी करून संबंधित कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून या नव्या नियमाने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
विद्यापीठाची प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 15 जूनपासून सुरू झाली आहे. मतदार नोंदणीसह नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ऍकेडमिक बॅंक ऑफ क्रेडिटमध्ये(एबीसी) विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे.
दोन्ही नोंदणी पूर्ण केल्यावरच विद्यार्थी प्रवेशासाठी पुढील नोंदणी करू शकतात. मतदार नोंदणी आणि एबीसी नोंदणी बंधनकारक केल्याने प्रवेशप्रक्रिया किचकट झाली आहे.





