नगर :शेवटच्या दोन तासांत मतदारांच्या रांगा

राहुरी तालुक्यात 21 ग्रामपंचायतींसाठी 70 टक्के मतदान; सोमवारी सकाळी निकाल
राहुरी – तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बहुसंख्य ठिकाणी 60-65 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाले होते. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक ग्रामपंचायतीत मतदारांची मोठी गर्दी झाली होती. सरासरी सत्तर टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. शेवटच्या दोन तासात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. बारागावनांदूर, ब्राह्मणी, टाकळीमियॉं गावांमध्ये उशीरापर्यंत मतदान चालू होते.
काही ग्रामपंचायतीत सुरुवातीपासून मतदानाचा वेग चांगला होता. काही गावांमध्ये मात्र सकाळी मतदानाचा वेग कमी होता. पहिल्या दोन तासात तेथे जेमतेम दहा- पंधरा टक्केवारीपर्यंत मतदान झाले होते. परंतु नंतर मतदानाचा वेग हळूहळू वाढला. तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीत मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडल्याची माहिती तहसीलदार चंद्रसिंह राजपूत यांनी दिली.
तालुक्यातील ब्राह्मणी, डिग्रस, बारागाव नांदूर व देसवंडी, टाकळीमियॉं येथे कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ स्वरूपात शाब्दीक बाचाबाची झाली. त्याचा अपवाद वगळता तालुक्यात सर्वत्र मतदान शांततेत व सुरळीत पार पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत गावातील मतदानाची टक्केवारीः कानडगाव- 73.89, चिंचोली – 65.33, निंभेरे- 64.75, सडे- 74.53, डिग्रस- 52.88, घोरपडवाडी -88.42, मोमीन आखाडा- 80.18, दरडगांवथडी- 79.69, धामोरी बु. -75.46,
धामोरी खुर्द -79.70, म्हैसगांव – 67.66, देसवंडी -80.23, तमनर आखाडा -83.33, गंगापूर- 79.10, बारागांवनांदूर- 53.95, ब्राह्मणी -54.54, माहेगांव- 80.76, मांलुजे खुर्द- 83.10, मुसळवाडी- 56.90, टाकळीमियॉं -66.39 शिलेगांव -69.51 अखेरच्या दोन तासांत सरासरी मतदानाची टक्केवारी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे.




