Nagar : अहमदनगर महाविद्यालयात नेक्सजेन प्रदर्शन
Updated On:

अहिल्यानगर : अहमदनगर विद्यालय बी.बी.ए. विभागाच्या विद्यार्थ्यांतर्फे नेक्सजेन २०२५ प्रदर्शनाचे आयोजन दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात नगरकरांना खरेदी व विक्रीचा अनुभव घेता येणार आहे. हे प्रदर्शन अहमदनगर महाविद्यालय येथील प्लेग्राउंडवर होणार असून या प्रदर्शनात विविध प्रकारचे ५५ स्टॉल आहेत. त्यामध्ये कपडे, मोबाईल, ॲक्सेसरीज, ज्वेलरी, विविध एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ऑटोमोबाईल आणि फूड स्टॉल आहेत.
या प्रदर्शनात सर्व नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्याहस्ते करण्यात येणार आहे





