नगर| युवराज वालतुरे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

नगर, (प्रतिनिधी) – आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी क्रीडा संघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय कुस्ती स्पर्धेत सोनई (ता.नगर) येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थी युवराज भागीनाथ वालतुरे याने ५७ किलो वजन गटात बाजी मारली असून त्याची सांगली येथे दि.१० व ११ मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नगर विभागीय कुस्ती स्पर्धा काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील परिक्रमा डी. फार्मसी कॉलेजच्या मैदानावर मंगळवारी (दि.६) पार पडल्या. या स्पर्धेत नगर विभागातील ११ कॉलेजच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये युवराज वालतुरे याने विभाग स्तरावर बाजी मारत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. सांगलीच्या पेठ येथील नानासाहेब महाडीक पॉलिटेक्निक कोलेजच्या मैदानावर दि.१० व ११ मार्च रोजी या स्पर्धा रंगणार आहेत.
युवराज वालतुरे हा नेवरगाव (ता.गंगापूर ) येथे भागीनाथ वालतुरे, योगेश वालतुरे, विवेक वालतुरे, शेखर वालतुरे, शुभम वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या स्पर्धेसाठी त्यास मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सहसचिव प्राचार्य डॉ. विनायक देशमुख, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. धावटे, यासह प्रा. संदीप कर्डीले, प्रा. चेतन केदारे, प्रा. रोहन सोनवणे, प्रा. अमोल पुंड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.





