Nagar News | रांगोळीच्या माध्यमातून मतदान जागृती स्तुत्य उपक्रम

श्रीरामपूर, – रांगोळी ही भारतीय प्राचीन लोककला असून, पांढऱ्या रांगोळीवर विविध रंग भरून सुंदर कलाकृती सादर करणे, हा विशेष गुण असून या माध्यमातून मतदान जागृती केली आहे. हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे निवडणूक निरीक्षक अरुण कुमार म्हणाले. नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्यावतीने मिशन अमृत – 75 ” आमची विधानसभा आमचे ग्रंथालय” मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदान जागृती निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज श्रीरामपूर नगर परिषद लोकमान्य टिळक वाचनालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी निवडणूक निरीक्षक अरुण कुमार बोलत होत्या. प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या ठिकाणी एकूण 23 रांगोळी असून 23 वेगवेगळ्या पद्धतीने मतदानाचा प्रचार प्रसार करण्याचे मोठे काम या महिलांनी केले असल्याचे भावना यावेळी निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांनी बोलून दाखविल्या.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक माधवी मनोज जाधव, द्वितीय क्रमांक साक्षी अरुण बर्डे, निकिता आनंद काळे, तृतीय क्रमांक भारती देशमुख यांनी पटकावला. उत्तेजनार्थ दिशा छतवाणी, प्रीती अहुजा, टीना राजपुरोहित, निरमा निम्मा यांना बक्षीस मिळाले. याप्रसंगी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, स्वीप नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार सुनिता धिमते,उपमुख्याधिकारी महेंद्र ताकपिरे, ग्रंथालय स्वाती पुरे, गोरख दौंडे,संजय प्रधान, सिध्दार्थ गवारे, रामकृष्ण अहिरे, अरूण तुपे, अमोल साळुंके, नितीन अपिल, राजेश जेधे, स्वप्निल माळवे, विजय झिंगारे, नितीन पवार, हेमलता दसरे, रितीका अंधारे, पुजा लांडगे, प्रणिता करवंदे, प्राची चितळे, अर्चना पाठे, कमल गवारे, मंगल दुपाटी, इंदुमती गाढे,प्राची जैत, नेहा पंडागळे व ज्येष्ठ वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षकांची जबाबदारी शिवाजी गायकवाड यांनी पार पाडली.





