Nagar : ऊस तोडणी कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

नेवासा : येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व श्री ज्ञानेश्वर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड कामगार मजूर व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी शिबिर श्री ज्ञानेश्वर कामगार कल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी सेक्रेटरी रवींद्र मोटे होते. संचालक अशोकराव मिसाळ, संचालक दादासाहेब गंडाळ, शेतकी अधिकारी नंदकिशोर पाटील, डॉ.कैलास कानडे, डॉ.रजनीकांत पुंड, .डॉ.वैशाली कोरडे, प्रा.संतोष सोनवणे, सुरेश थोरात, अकुंश दाभाडे , पोपट उगले आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिरामध्ये ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीयांनी सहभाग घेत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. बडे मुकादम, राजू बोरुडे, राजू काकडे, योगिता गायकवाड , ज्योती देशमुख, मनीषा म्हस्के, ज्योती बर्डे, गायत्री शिराळे आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडे व कुकाणे येथील नर्सिंग स्टाफ व जिजामाता नसिंग कॉलेज यांचे सहकार्य लाभले.प्रास्तविक अकुंश दाभाडे यांनी तर राजेंद्र चिंधे यांनी आभार मानले.





