Nagar : मुळा कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाची सांगता

सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाचा सांगता कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे, विश्वास डेरे तसेच ऊस तोडणी मुकादम रतन मानसिंग चव्हाण यांनी सपत्नीक गव्हाण व उसाच्या मोळीची विधीवत पूजा केली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची शेवटची मोळी टाकून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, बापूसाहेब शेटे, बाबासाहेब भणगे, बबनराव दरंदले, सोपानराव पंडीत तसेच माजी सभापती रावसाहेब कांगुणे, हभप.बाळकृष्ण महाराज सुडके , बाळासाहेब सोनवणे, तुकाराम भणगे, तुकाराम बानकर, दत्तात्रय बेल्हेकर, ॲड.गोकुळ भताने, परमानंद जाधव, आदिनाथ रौंदळ, तुकाराम गुंजाळ, दिलीपराव पोटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले आदीसह कारखान्याचे कर्मचारी व ऊसतोडणी यंत्र मालक, तोडणी व वाहतूक मुकादम व मजुर, ट्रक, ट्रॅक्टर मालक उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्षेत्रातील सर्व उपलब्ध उसाचे गाळप पूर्ण करून हंगाम यशस्वीपणे चालवल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, वर्क्स मॅनेजर एस.डी.पवार, शेतकी अधिकारी विजय फाटके,चीफ इंजीनिअर डी.बी.नवले, चीफ केमिस्ट एस.डी.देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, को.जन इनचार्ज ए.डी.वाबळे, प्रोडक्शन मॅनेजर एस.डी.गाडे यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याने या गळीत हंगामात ६ लाख ३१ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले. ५ लाख ४८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले, ४ कोटी ५५ लाख युनिटच्या वीज निर्मितीबरोबरच ६१ लाख ९० हजार लिटर इथेनॉल व ८२ लाख लिटर आर.एस. तयार केले. एकूण ८८ दिवस गळीत हंगाम सुरु होता.
सांगता प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव पाटील चौधरी यांनी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. पुढील गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी त्यांचा सर्व ऊस मुळा कारखान्यालाच गळीतासाठी द्यावा, असे अवाहन केले. सूत्रसंचालन कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी केले. मॅनेजर व्ही.के.भोर यांनी आभार मानले.





