नगर – करोना नियम शिथिल झाले असले तरी जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 34 रुग्णांना करोना मृत्यू झाली नोंद झाली आहे. आज 560 नवीन बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 111 झाली आहे.
दरम्यान, आज 585 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 136, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 259 आणि अँटिजेन चाचणीत 165 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 06, अकोले 41, जामखेड 09, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 09, नेवासा 01, पारनेर 03, पाथर्डी 02, राहुरी 01, संगमनेर 42, श्रीगोंदा 16, कंटोमेंट बोर्ड 01, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 17, अकोले 22, जामखेड 03, कर्जत 17, कोपरगाव 18, नगर ग्रा.08, नेवासा 19, पारनेर 12, पाथर्डी 02, राहाता 17, राहुरी 14, संगमनेर 53, शेवगाव 19, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 24, कॅंटोन्मेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 165 जण बाधित आढळुन आले. मनपा 02, अकोले 05, जामखेड 01, कर्जत 15, कोपरगाव 03, नगर ग्रा. 02, नेवासा 07, पारनेर 34, पाथर्डी 28, राहाता 05, राहुरी 04, संगमनेर 21, शेवगाव 24, श्रीगोंदा 10 आणि श्रीरामपूर 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.