नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचे निधन; डोक्याला मार लागल्याने सुरु होते उपचार
Nagaland Governor death | नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नईतील निवासस्थानी 8 ऑगस्ट रोजी ते पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी एल. गणेशन यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून गणेशन यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गणेशन यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. Nagaland Governor death |
एल. गणेशन यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तमिळनाडूचे माजी अध्यक्ष अण्णामलाई यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. Nagaland Governor death |
Pained by the passing of Nagaland Governor Thiru La. Ganesan Ji. He will be remembered as a devout nationalist, who dedicated his life to service and nation-building. He worked hard to expand the BJP across Tamil Nadu. He was deeply passionate about Tamil culture too. My thoughts… pic.twitter.com/E1VXtsKul3
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2025
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करत लिहिले की, एल. गणेशन हे एक समर्पित राष्ट्रवादी म्हणून स्मरणात राहतील, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन सेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित केले. एल. गणेशन यांनी तमिळनाडूमध्ये भाजपच्या विस्तारासाठी खूप परिश्रम घेतले. तमिळ संस्कृतीशीही त्यांचा संबंध होता. Nagaland Governor death |
कोण होते एल गणेशन?
गणेशन यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९४५ रोजी तामिळनाडूच्या इलाकुमिकवन येथे झाला होता. गणेशन यांचा तामिळ ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता. गणेशन यांच्या वडिलांच्या निधनानंतर गणेशन यांचा त्यांचा भावाने सांभाळ केला. त्यांनी शिक्षणावर भर दिला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले होते. अजीवन अविवाहित राहिलेले गणेशन हे नोकरी सोडून पूर्णवेळ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते झाले होते.
एल. गणेशन हे मध्य प्रदेशचे राज्यसभा खासदार राहिले होते. गणेशन हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अनुभवी नेते होते. त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये नागालँडच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली आणि ते या पदावरच होते. एल. गणेशन ऑगस्ट 2021 पासून नागालँडचे राज्यपाल होण्यापूर्वी मणिपूरचे राज्यपाल होते.
2022 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला तेव्हा एल. गणेशन यांना या राज्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. Nagaland Governor death |
हेही वाचा





