नागा चैतन्य आणि शोभिताची लग्नपत्रिका व्हायरल; कधी पार पडणार विवाहसोहळा?

Sobhita Dhulipala and Naga Chaitanya Wedding | दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटानंतर त्याने गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. त्यानंतर मागील महिन्यात त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभाला सुरुवात झाली असून, आता त्यांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या पत्रिकेवरील लग्नाची तारीख स्पष्ट पहायला मिळत आहे. यात वधू-वरांच्या नावांबरोबरच कुटुंबातील सदस्यांची माहितीही या पत्रिकेत देण्यात आली आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी दोघांचा लग्नसमारंभ पार पडणार आहे. मंत्रणाबरोबरच वऱ्हाडींसाठी एक खास गिफ्ट बास्केटही देण्यात येत आहे. या बास्केटमध्ये खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, कपडे, फुले ठेवण्यात आले आहेत. अधिकृतरीत्या लग्नाच्या ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली नाही तरी चाहत्यांमध्ये या लग्नाबद्दल खूप उत्सुकता आहे.
#NagaChaitanya and #SobhitaDhulipala wedding card viral pic.twitter.com/kjjLJnzGtM
— Deeksha Tripathi (@Deekshatripati) November 17, 2024
काही दिवसांपूर्वीच शोभिताने लग्नाआधीच्या विधींचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. यावेळी ती कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दक्षिणात्य पद्धतीने विधी करताना दिसली. शोभिताच्या या फोटोंवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केले होते.
दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिता धुलीपालाशी हे दुसरं लग्न करणार आहे. 2017 मध्ये त्याने पहिलं लग्न सामंथा रुथ प्रभूशी केलं पण लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर नागा चैतन्यचं नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडलं जाऊ लागले. अखेर आता ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. Sobhita Dhulipala and Naga Chaitanya Wedding |
हेही वाचा :
मोदी म्हणाले, “बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा” ; आता थेट राहुल गांधी ट्विट करत म्हणाले,”…





