नागा चैतन्य आणि शोभिताच्या घरी लगीनसराई सुरू….

Shobhita Dhulipala Wedding Rituals | दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. यानंतर आता लवकरच हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या काही विधींना सुरुवात झाली आहे.
शोभिताच्या घरी त्यांच्या लग्नाची थाटामाटात तयारी सुरू आहे. या विधींचे काही फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शोभिताने नारिंगी रंगाची साडी नेसली असून तिने हातात हिरवा चुडा घातला आहे. ती कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दक्षिणात्य पद्धतीने विधी करताना दिसत आहे. Shobhita Dhulipala Wedding Rituals |
View this post on Instagram
शोभिताने हे फोटो शेअर करत, ‘गोधुमा राय पसुपू विधी.’ त्याचबरोबर अभिनेत्रीने ‘आणि त्याची अखेर सुरुवात झाली आहे,’ असं कॅप्शन लिहिलं आहे. शोभिताच्या या फोटोंवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलं आहे. तसेच तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.
नागा चैतन्यचे शोभिता धुलीपालाशी हे दुसरं लग्न करणार आहे. 2017 मध्ये त्याने पहिलं लग्न सामंथा रुथ प्रभूशी केलं पण लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर नागा चैतन्यचं नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडलं जाऊ लागले. अखेर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. Shobhita Dhulipala Wedding Rituals |
हेही वाचा:





