लॉंरेन्स बिश्नोईला थेट विधानसभा लढवण्याची ऑफर; शहिद भगतसिंग यांचा उल्लेख करत ‘या’ पक्षाने केली विनंती

Lawrence Bishnoi offered to Contest Election | अभिनेता सलमान खानचा कट्टर विरोधक म्हणून बिश्नोई गँग ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. यादरम्यान तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला एका पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक लढण्याची ऑफर दिली आहे.
उत्तर भारतीय विकास सेना (UBVS) या नावाच्या राजकीय पक्षाने साबरमती मध्यवर्ती कारागृहात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला पत्र लिहून विधानसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे. UBVS हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला पक्ष आहे. याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोई यांना पत्र लिहीत महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.
सुनील शुक्ला यांचे पत्र
सुनील शुक्ला यांनी पत्रात म्हटले की, “आम्हाला गर्व आहे की तुम्ही पंजाब राज्यात जन्मलेले उत्तर भारतीय आहात आणि आम्ही ‘उत्तर भारतीय विकास सेना’ या नावाने एक राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत राजकीय पक्ष आहोत, जो भारतात उत्तर भारतीयांच्या अधिकारांसाठी काम करत आहे.” Lawrence Bishnoi offered to Contest Election |
इतकेच काय तर, उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी यावेळी धक्कादायक वक्तव्य केले आहे. “आम्ही तुमच्यामध्ये शहिद भगतसिंग यांना बघतो. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि इतर पाच उत्तर भारतीय राज्यांतील लोक उत्तर भारतीय आहेत. मग जर भारत एक युनिट असेल तर आपण या अधिकारापासून वंचित का आहोत?” असा सवाल सुनील शुक्ला यांनी केला. Lawrence Bishnoi offered to Contest Election |
“आम्ही तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देत आहोत. आम्ही तयार आहोत, फक्त आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत. उत्तर भारतीय विकास सेनेचे कार्यकर्ते आणि अधिकारी उत्तम कामगिरीने निवडणूक जिंकून देऊ,” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. तसेच उमेदवारांची नावे देखील जाहीर केली जात आहे.
हेही वाचा:
“मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु…”; संजय राऊतांच्या आरोपानंतर शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया





