हिजबुल्लाहने आपल्या संघटनेचा नवा उत्तराधिकारी निवडला; आता नईम कासिम नवा प्रमुख

बेरूत – हिजबुल्लाहने आपल्या संघटनेचा नवा उत्तराधिकारी निवडला आहे. हसन नसराल्लाह यांची हत्या झाल्यानंतर नईम कासिम यांची संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते याआधी हिजबुल्लाचे उपमहासचिव होते.
एक निवेदन जारी करून हिजबुल्लाहने म्हटले आहे की शूरा कौन्सिलने एकमताने कासिमची निवड केली आहे. नईम यांची 1991 मध्ये संघटनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. हिजबुल्लाहने सांगितले की, कासिमचे संघटनेबद्दलचे समर्पण पाहून त्याची प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. हसन नसराल्लाहनंतर कासिम हा हिजबुल्लाहचा नंबर दोनचा नेता मानला जात होता.
कासिम हा नसरल्लाचा दीर्घकाळ सहाय्यक होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो संस्थेचे कार्यवाह म्हणून कार्यरत होता. हिजबुल्लाचा नवा प्रमुख म्हणून नईम कासिम यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी, इस्रायलविरुद्ध विजय मिळेपर्यंत हिजबुल्लाह नसराल्लाह यांच्या धोरणांचे पालन करत राहील, असे संघटनेने वचन दिले आहे.





