War Updates: हिज्बुल्लाहवर हल्ले सुरूच राहणार; इराणच्या इशाऱ्यांदरम्यान नेतन्याहूंचा मोठा निर्णय
War Updates: आरोग्यमंत्री राकान नासेरद्दीन यांच्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांत आतापर्यंत 203 जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक जखमी झाले आहेत. वाढत्या आकड्यांमुळे परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होत आहे.

War Updates: इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी स्पष्ट केले आहे की हिजबुल्लाह (Hezbollah) विरोधातील लष्करी कारवाई थांबवली जाणार नाही. इस्त्राईल (Israel) आणि आणि (Iran) यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच युद्धविरामाच्या प्रयत्नांदरम्यान हे वक्तव्य करण्यात आले आहे.
नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर सांगितले की, इस्रायली लष्कर पूर्ण ताकद, अचूकता आणि ठाम भूमिकेसह हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई करत आहे. ही मोहीम सतत सुरू राहील आणि तिचा उद्देश देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. त्यांनी स्पष्ट केले की ही कारवाई कोणत्याही एका भागापुरती मर्यादित नसून, जिथे गरज भासेल तिथे हल्ले केले जातील.
उत्तरेकडील नागरिकांची सुरक्षा हेच उद्दिष्ट –
नेतन्याहू यांनी सांगितले की, उत्तरेकडील इस्रायलमधील नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी परतता यावे, यासाठीच ही कारवाई सुरू आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत लष्करी मोहिम थांबवली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
हेही वाचा – Stock Market: ‘या’ कारणांमुळे शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण
दरम्यान, लेबनाॅन (Lebanon) मध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिका-इराण यांच्यातील तात्पुरता युद्धविराम धोक्यात आला आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला असून, इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे.
होर्मुज सामुद्रधुनी वरून युरोपची चिंता –
या पार्श्वभूमीवर युरोपीय युनियन (European Union) ने होर्मुज सामुद्रधुनीमधून जहाजांची मुक्त वाहतूक कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे. इराणने या मार्गावर शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर युरोपने त्यास विरोध दर्शवला आहे. जागतिक व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे युरोपचे मत आहे.
हानीचे वाढते प्रमाण –
इराणमधील संघर्षात मृतांचा आकडा 3000 च्या पुढे गेला आहे. फॉरेन्सिक प्रमुख अब्बास मस्जेदी अरानी यांच्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर लेबनानमध्येही परिस्थिती गंभीर आहे. आरोग्यमंत्री राकान नासेरद्दीन यांच्या माहितीनुसार, इस्रायलच्या ताज्या हल्ल्यांत आतापर्यंत 203 जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक जखमी झाले आहेत. वाढत्या आकड्यांमुळे परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होत आहे.





