Vinesh Phogat : नाडाची विनेश फोगटला नोटीस; सध्याच्या पत्त्याबाबद 14 दिवसांत उत्तर मागितले

नवी दिल्ली – नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) बुधवारी कुस्तीपटू विनेश फोगटला तिच्या पत्त्याची माहिती न दिल्याबद्दल नोटीस बजावली आहे. यासंदर्भात नाडाकडून १४ दिवसांत उत्तर मागवण्यात आले आहे.
सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागानंतर डोप चाचणीसाठी त्यांच्या उपलब्धतेबद्दल नाडाला कळवावे लागते. तपशील भरल्यानंतर खेळाडू नियोजित वेळी त्याजागी हजर झाला नाही तर त्याला नियमांचे उल्लंघन मानले जाते.
नाडाने जारी केलेल्या नोटीसमध्ये विनेश तिच्या पत्त्याबाबत स्पष्टपणे माहिती दिली नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक, विनेशने 9 सप्टेंबर रोजी सोनीपतच्या खरखोडा गावात तिच्या घरी डोप चाचणीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली होती. मात्र, नियोजित वेळी व तारखेला ती तेथे आढळली नाही. आता नाडाने हे नियमांचे उल्लंघन मानले असून उत्तर मागितले आहे.
नियम काय सांगतो?
ऑलिम्पियन विनेशला या परिस्थितीत तिची चूक मान्य करावी लागेल किंवा ती जवळपास 60 मिनिटे त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा पुरावा द्यावा लागेल. नियमानुसार, एकदा भेट न होणे हे डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन मानले जात नाही.
नाडाला अँथलीटवर करण्यासाठी 12-महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा निवासस्थानी नोंदणी करण्यात अयशस्वी होणे किंवा चाचणी चुकणे असणे आवश्यक आहे.





