“96 लाख खोटे मतदार घुसवले, निवडणुका घेऊनच दाखवा…”; राज ठाकरेंचा थेट इशारा

Raj Thackeray | देशासह राज्यात मतदार यादींवरुन सुरू असलेल्या गोंधळावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता महाराष्ट्राच्या मतदारयादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज ठाकरे आज रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
“मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल आठ ते साडेआठ लाख मतदार घुसवण्यात आले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले आहेत,” असे राज ठाकरे यांनी म्हटले.
मुंबई, पुणे, नाशिक येथे 8 ते 8.5 लाख मतदार भरले आहेत. अशाच निवडणुका होणार असतील तर मग कशासाठी प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे. उमेदवार द्यायचे? असे संतप्त प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. हा महाराष्ट्र आणि मतदाराचा अपमान आहे. राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, त्यांना मतं मिळत नाहीत, असे सत्ताधारी म्हणत असतात. त्यांचा एकही आमदार आणि खासदार नाही, असेही म्हटले जाते. पण अशाप्रकारे बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात असतील तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. Raj Thackeray |
‘गल्लीगल्लीत माहिती आहे, कशी सत्ता आली’
“सत्ताधाऱ्यांकडून मतदार यादीतच गणित सेट केले जात आहे. मग तुम्ही मतदान करा नाहीतर नका करु. मग सामान्य जनतेच्या मतदानाला काय अर्थ उरतो? आम्ही निवडणूक आयोगावर बोललो की, सत्ताधारी चिडतात. तुम्हाला कोणी विचारलंय? आम्ही केलेले आरोप मनाला लागतात म्हणूनच सत्ताधारी बोलत आहेत ना? तुम्हाला राग येतोय कारण तुम्ही शेण खाल्लंय. गल्लीगल्लीत माहिती आहे, कशी सत्ता आली, कसे राजकारण सुरु आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. Raj Thackeray |
‘प्रचंड यश मिळूनहीसन्नाटा होता’
पुढे ते म्हणाले, “तुम्ही तुमचं मत द्या नाहीतर नका देऊ, मॅच फिक्सिंग झालं आहे. हे कोणाचं षडयंत्र, लोकशाही आहे. मग कसा आमचा उमेदवार निवडून येईल. जर गणितच सेट करुन ठेवणार असाल तर मतदान करा किंवा नको, निकाल ठरला आहे. 232 आमदार निवडून आले तरीही महाराष्ट्रात सगळीकडे भयाण शांतता होती. इतकं प्रचंड यश मिळूनही सन्नाटा होता. कुठे मिरवणूक, जल्लोष नाही. मतदारांसह निवडून आलेलेही अवाक झाले होते. त्यांनाही आपण निवडून कसे आलो आहोत समजलं नाही. सगळ्यांना निवडणुका कशा झाल्या आणि विजय कसा मिळत आहे हे समजलं. त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा,” असे आव्हानही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले.
“मतदार याद्यांमध्ये ज्या प्रकारचा गोंधळ सुरु आहे, तो आताच नाही, तर गेल्या काही वर्षांचा आहे. 2016-17 ला मी याच्याच मतदार मशीन आमि मतदार याद्या विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी आपली पत्रकार परिषदही झाली होती. सगळ्या पक्षाचे लोक तिथे आले होते. अनेकांना मी काय बोलत आहे याचं गांभीर्यचं समजलं नाही. प्रत्येकाच्या दरवाजावर टकटक होऊ लागली तेव्हा निवडणुकीचे काय प्रकार सुरु आहेत हे सर्वांना समजलं,” असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. Raj Thackeray |
हेही वाचा :





