Earthquake : भूकंपाने देश हादरला..! नागरिक घरातून सैरावैरा पळाले, सर्वत्र हाहाकार
Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये रात्री ९:०५ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. याचे पडसाद कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्येही उमटले असून नागरिक दहशतीखाली आहेत.

Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा एकदा भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमीन थरथरल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पळाले.
या भूकंपाचे धक्के केवळ म्यानमारपुरते मर्यादित न राहता, भारतामधील कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही जाणवले. काही सेकंद जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
भूकंपानंतर लोक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी थांबले. सध्या जिवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
भूकंपाच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे म्यानमारसह शेजारील देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.





