‘शिवसेनेपेक्षा माझा पक्ष ताकदवान’ – रामदास आठवले

मुंबई – उत्तर प्रदेशातील जनतेने ‘डबल इंजिन’ सरकारला जनादेश दिला आहे. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेच्या चाव्या राखण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यश आले आहे. पंजाबमध्ये देखील आपनंच बाजी मारल्यामुळे काँग्रेससाठी या निवडणुकीत हाती काहीही न लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेलाही कुठेच यश न मिळाल्याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. यासंदर्भात आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
ते माध्यमांशी बोलतांना “माझ्या मते शिवसेनेला इतर राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांत ताकदवान आहे. मणिपूरमध्ये तर माझा उमेदवार फक्त १८३ मतांनी हरला आहे. पोस्टल वोटमध्ये तो हरला. नॉर्थ इस्टमध्ये सगळ्या राज्यांत माझा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला बाहेरच्या राज्यांत यश मिळणं अशक्य आहे”असेही ते म्हणाले आहे.





