‘विरोधकांनी साखर कारखाने चालून दाखवावेत त्यांना माझं खुलं आव्हान’; उपमुख्यमंत्री अजित पवार

Updated On:

बारामती – राज्यातील साखर कारखाण्याची अवस्था बिकट आहे. महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत. विरोधक आम्ही खाजगी कारखान्याचे समर्थक, पाठीराखे आहोत. अश्या वलगणा करतात.

आजही काही जण पाहणी करण्यासाठी जातात आणि काहीही बोलतात. काही दिवसांपूर्वी पारनेर च्या कारखान्या संदर्भात माझ्यावर आणि पवार साहेबांवर चुकीचे आरोप लावले जातात यात काही तथ्य नाही यात पवार साहेबांचा आणि माझा कुठलाही कसुभर सुद्धा संबंध नाही. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तसेच, ते पुढे म्हणले की… माझी खासदार नानासाहेब नवले यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून तो कारखाना स्वतःसाठी खरेदी केलेला आहे. भाजपच्या काळात तो कारखाना त्यांच्याच प्रशासनाने विक्रीसाठी काढलेला आहे. अशी सर्व परिस्थिती असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  ते बारामतीत सोमेश्वर साखर कारखाना निवडणूकीच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार यांचा विरोधकांना अप्रत्यक्ष धमकीवजा इशारा…

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे आता विरोधकातील काही हौसे, गवसे, नवसे यांनी पॅनल उभा केला आहे. मात्र त्यांनी पुणे मार्केट कमिटीत काय दिवा लावला आहे. तुम्हाला माहीत नाही त्याचे जर बाहेर काढले तर अवघड होईल असा अप्रत्यक्ष धमकीवजा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विरोधी पॅनलचे प्रमुख आणि माझी पुणे मार्केटचे सभापती दिलीप खैरे यांना दिलाय.

ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्याने साखरेला आता चांगला भाव…

साखरच विकली जात नव्हती यामुळे कितीतरी साखर पोती गोडाऊन मध्ये पडून होती याचा फटका अनेक साखर कारखान्यांना बसला. मात्र ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्याने साखरेला आता चांगला भाव आला आहे. आता साखर विक्रीतून जास्त नफा मिळणार आहे.

ही आपल्याला सुवर्णसंधी आहे याचा सभासदांनी विचार करावा करून आपल्या विचाराचं संचालक बोर्ड निवडून द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर च्या सभासदांना केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...