Rupali Chakankar : ‘माझे नाव, फोटो, ओळख, वैयक्तिक शैली आणि…’ रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
Rupali Chakankar : चाकणकरांना द्यावा लागला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी फोटो, व्हिडीओ, रील्स किंवा प्रमोशनल साहित्य तयार करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
रुपाली चाकणकर यांनी आपलं नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैलीची अधिकृतपणे ट्रेडमार्क नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. हे त्यांनी नेमकं कोणत्या कारणामुळे केले हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रुपाली चाकणकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत लिहिले की, “माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे.
माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.”
माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे.
माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 15, 2026
“असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
चाकणकरांना द्यावा लागला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा काही महिन्यांपूर्वी राजीनामा होता. मात्र, आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले होते.
हेही वाचा:





