“मी बेशुद्ध होईपर्यंत वडील मला मारायचे, त्यांच्या…” उर्फी जावेदने सांगितली बालपणीची आप बिती

मुंबई – उर्फी जावेदसाठी तिच्या फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही नवीन गोष्ट नाही. फॅशन सेन्सेशन बनलेली उर्फी तिच्या कपड्यांमुळे आणि तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या कायम निशाण्यावर असते. वाईटरित्या ट्रोल झाल्यानंतरही उर्फी आपली शैली सोडत नाही आणि अनेकदा ती ट्रोलिंगला हरकत नसल्याचे सांगते. पण, नुकतच उर्फीने आपल्या वडिलांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
उर्फी जावेदने ती लहानपणी कशी होती याचा खुलासा केला. अभिनेत्रीचे वडील तिच्यावर किती शारीरिक अत्याचार करायचे. मात्र, वडिलांबद्दल आणि आपल्या बालपणाबद्दल बोलण्याची उर्फीची ही पहिलीच वेळ नाही. उर्फी जावेद म्हणाली, ‘मी एक आत्मविश्वासू मुलगी होते आणि माझे कोणतेही मित्र नव्हते. मी लहानपणी खूप गोंधळून जायचे.
एका पॉडकास्टवर बोलताना उर्फी तिच्या रोजच्या आयुष्यातील विविध गोष्टींवर भाष्य केले. उर्फी म्हणाली, ‘मी इतका वाईट आहे का? कदाचित कोणीही मला स्वीकारणार नाही, कोणतेही कुटुंब मला स्वीकारणार नाही. मला असे वाटते की कोणीही माझे मित्र होऊ इच्छित नाही. तसेच या सर्व गोष्टी ट्रोलिंगमुळे देखील कधी कधी वाटत असलयाचे उर्फीने यावेळी स्पष्ट केले.
वडिलांच्या आठवणी सांगताना उर्फी म्हणते,”मी बेशुद्ध होईपर्यंत वडील मला मारायचे. मी माझ्या वडिलांच्या अजिबात जवळ नव्हते.” तसेच उर्फी सांगते जेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलाला मारता तेव्हा त्याचा त्या मुलावर खूप नकारात्मक परिणाम होतो. उर्फीने यापूर्वी देखील आपल्या बालपणीच्या दर्दनाक कहाण्या सांगितलेल्या आहेत.





