Chandrashekhar bawankule : “माझ्या परिवाराला त्रास झाला, सगळं चांगलं चालू असताना….’, कसिनोतील ‘त्या’ फोटोवर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

Chandrashekhar bawankule – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मकाऊ कसिनोमधील एक फोटो ट्विट केला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.
राऊत (Sanjay raut twitt) यांनी केलेल्या ट्विटमध्ये थेट नाव घेणं टाळलं असलं तरी हा फोटो भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांचा असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. राऊतांनी पोस्ट केलेल्या या फोटोबाबत आता स्वतः चंद्रशेखर बावनकुळे उत्तर दिल आहे. नुकतंच भारतात परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) म्हणाले की, “मागच्या ३४ वर्षांपासून राजकीय, सामाजिक जीवनात आहे. भाजपा-शिवसेना युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळात अनेक मित्र मंडळी आहेत.
चारवेळा आम्ही निवडून आलो आहोत. अशा फोटोंच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही, असं मला वाटतं. ३४ वर्षे काम करून आम्ही इमेज तयार केली आहे. त्यामुळे हा प्रयत्न केला असेल तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ.
पण यामुळे माझ्या परिवाराला त्रास झाला. माझ्या मुलीने आणि सुनेने माझ्याकडून तीन दिवसांचा वेळ घेऊन नियोजन केलं होतं. हाँकाँग या पर्यटनस्थळी गेलो. सगळं चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनात आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. राजकारणात काम करताना असे प्रयत्न चुकीचे वाटतात. त्यामुळे मला आणि परिवाराला वाईट वाटलं.
सगळ्यांनाच माहितेय की कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करावं लागतं. मकाऊ किंवा हाँककाँगला गेल्यानंतर कॅसिनो क्रॉस करूनच सगळीकडे जावं लागतं. कोणीतरी असे प्रयत्न करायचे आणि ३५० कोटींचा आरोप केला. एक रुपयाही तुमच्या बॅगेत असला तर तीन-तीन वेळा चेकिंग करावी लागते.’ असं देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.





