“महाभारत बनवणे माझं स्वप्न”; हे पात्र साकारण्याची इच्छा, आमिर खान नेमकं काय म्हणाला?

Aamir Khan Mahabharata Movie : बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याने साऊथचा आयकॅान स्टार अल्लू अर्जुनने भेट घेतली होती. या भेटीची चर्चा बीटाऊनमध्ये रंगली होती. या भेटीमागचा अर्थ म्हणजे आमिर अल्लुला घेऊन हिंदी चित्रपट करणार असल्याचे बोलले गेले. यावर दोघांनाही खुलासा केलेला नाही. अशातच आमिरने त्याच्या महाभारत चित्रपटातील पात्रविषयी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. त्याने मुलाखतीवेळी महाभारत चित्रपटातील कोणाची भूमिका करायला आवडेल याविषयी सांगितले आहे.
आमिर खान बऱ्याच काळापासून त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट महाभारत चित्रपटाविषयी नेहमी सांगत असतो. नुकतीच त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा पोजेक्ट माझ्या हृदयाच्या जवळ असल्याचे सांगितले आहे. तसेच महाभारत बनवणे हे माझे स्वप्न आहे, पण ते खूप कठीण आहे, असे स्पष्ट केले. महाभारत ही एक मोठी फिल्म फ्रँचायझी असेल, ज्यामध्ये वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या भागांवर काम करतील. मुलाखतीवेळी आमिरला महाभारतामधील कोणते पात्र करायला आवडेल असा प्रश्न केला असता तो म्हणाला, “मला भगवान कृष्णाचे पात्र खूप आवडते. मी त्यांच्यापासून खूप प्रेरित आहे.” त्याच्या या उत्तरामुळे त्याला भगवान कृष्णाचे पात्र करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमिरच्या ‘सितारे जमीन पर’ची चर्चा
याच दरम्यान आमिरने ही अनेक चित्रपटांची मालिका असणार असल्याचे देखील सांगितले आहे. यासाठी वेगवेगळ्या दिग्दर्शकांची आवश्यकता भाासू शकते असे देखील त्याने सांगितले आहे. आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे, हा चित्रपट त्याच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. आमिरने ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आणि त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





