मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. सोशल मीडियावर देखील उर्फीचा मोठा चाहता वर्ग असून, इंस्टाग्रामवर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
दरम्यान, नेहमीच आपल्या हटके कपड्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या उर्फी जावेदच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे खुद्द अभिनेत्रीने आपल्या शरीरावर झालेल्या जखमांचं कारण सांगितलं आहे. उर्फीने या जखमांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत उर्फी म्हणते, “जेव्हा मी पूर्ण कपडे घातले, तेव्हा मला अशी अडचण येते. जेव्हा पूर्ण किंवा लोकरीचे कपडे घालते, तेव्हा मला अशी एलर्जी होते. ही माझ्यासाठी फार मोठी अडचण आहे. आता तुम्हाला देखील समजलं असेल की मी पूर्ण कपडे घालत नाही. पुरावा तुमच्या समोर आहे, माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे.’ असं अभिनेत्री म्हणत आहे. सध्या उर्फीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.