MVA Mahamorcha : परवानगी द्या अगर नका देऊ, आम्ही मोर्चा काढणारच – अजित पवार

Updated On:

मुंबई – राज्य सरकारने मोर्चाला परवानगी दिली नसली तरी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला अधिकार आहे. महाविकास आघाडीने येणाऱ्या 17 डिसेंबर मुंबई येथे राज्यद्रोहींविरोधी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी दिलेली नसली तरी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा आम्हाला आधिकार आहे असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला ठणकाहून सांगितले.

पुढे अजित पवार  म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्याचा प्रयत्न, आमच्या दैवतावर व महापुरुषांवर बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे या मोर्चाला परवानगी द्यायची की नाकारायची हा त्यांचा अधिकार आहे पण आम्ही मोर्चा काढणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

पुढे अजित पवार  म्हणाले की, सत्ताधारी लोकांना क्लीनचीट मिळायला लागली आणि विरोधकांच्या बंद केसची पुन्हा चौकशी होतंय. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. यातून सत्ताधारी बाजूच्या लोकांच्या सुरू असलेल्या चौकशींना क्लीनचीट मिळायला लागली आणि विरोधी बाजूच्या लोकांच्या चौकशी पूर्ण झाली असतानाही त्या रीओपन करण्याचा प्रयत्न होतोय. हे राजकीय सूडभावनेने होत आहे अशी शंका सर्वसामान्यांना आल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

Border Dispute : अजित पवारांची सत्ताधाऱ्यांकडे मागणी, म्हणाले “सीमाप्रश्न पेटण्यात विरोधकांचा हात असेल तर..”

दरम्यान, यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर काल दिल्ली येथे झालेल्या बैठकीसंदर्भात माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सध्या सीमाप्रश्न अधिक पेट घेण्यामागे विरोधकांचा हात असावा अशी काहींना शंका वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांनी या मागचा शोध घेऊन दूध का दूध और पानी का पानी करावं.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

2026-10-06 05:00:33

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तेसाठी 'पवार विरुद्ध पवार' ! सुनेत्रा पवार अन् युगेंद्र पवार आमनेसामने; पुरुषोत्तम जगतापांचा तिसरा घाव

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

2026-10-04 09:03:29

Sunetra Pawar : अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका; सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

2026-09-25 10:29:07

Ganesh Visarjan Pune : 'एवढाच निरोप सांगा बाप्पाला...’; गणेश विसर्जनादिवशी अजित पवारांची आठवण, पुण्यातील बॅनरने वेधले लक्ष

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

2026-09-20 19:30:20

Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी