दबावामुळेच राजीनामा दिला – मुश्ताक अहमद
Updated On:

नवी दिल्ली – अल्पसंख्याक असल्यामुळेच माझ्याविरुद्ध कटकारस्थाने करण्यात आली. यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला, असे स्ष्टीकरण हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिले आहे.
माझे नाव व धर्म यात सातत्याने फरक केला गेला. मला लक्ष्य बनवले गेले. गेली 9 वर्षे मी संघटनेच्या नियमांच्या कक्षेत राहूनच काम केले. मात्र, संघटनेतील काही व्यक्तींनी सातत्याने मला लक्ष्य केले. राजीनामा दिल्यानंतर मी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला याबाबत सविस्तर पत्र लिहिले असून त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवेन, असेही अहमद यांनी सांगितले.





