लष्कर-ए-तोयबाला सर्वात मोठा धक्का ! हाफिज सईदचा अत्यंत जवळचा दहशतवादी अबू कताल सिंघीची हत्या ; रियासी हल्ल्याचा होता मास्टरमाइंड

Murder of Abu Qatal Singhi । पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाला मोठा धक्का बसला आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल सिंघीची हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. झेलममध्ये काल रात्री अबू कताल सिंघीची हत्या करण्यात आली. अबू कतालने भारतात अनेक मोठे हल्ले केले आहेत. एनआयएने त्याला वॉन्टेड घोषित केले होते. हा दहशतवादी लष्करासह सर्व सुरक्षा संस्थांसाठी मोठी डोकेदुखी बनला होता.
अबू कताल हाफिज सईदच्या जवळचा Murder of Abu Qatal Singhi ।
दहशतवादी अबू कताल हा हाफिज सईदच्या खूप जवळचा होता. हाफिज हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मृत्युमुखी पडले होते. लष्कर-ए-तोयबाच्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले केले होते. या घटनेमुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले. दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली.

हाफिज सईदनेच अबूला जम्मू आणि काश्मीरवर मोठा हल्ला करण्याची जबाबदारी दिली होती. हाफिजनेच अबूला लष्कराचा मुख्य ऑपरेशनल कमांडर बनवले होते. हाफिज सईद अबूला आदेश देत असे, त्यानंतर तो काश्मीरमध्ये मोठे हल्ले करत असे.
राजौरी हल्ल्यात काय घडले? Murder of Abu Qatal Singhi ।
जानेवारी २०२३ मध्ये, एनआयएने राजौरी येथील हल्ल्यासाठी ५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये लष्करचे ३ पाकिस्तानी दहशतवादी देखील होते. १ जानेवारी २०२३ रोजी राजौरी जिल्ह्यातील धांगरी गावात नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाला. दुसऱ्या दिवशी आयईडी स्फोट झाला. या हल्ल्यात दोन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. आरोपपत्रात ज्या तीन दहशतवादींची नावे आहेत ते लष्करचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे, त्यांची ओळख सैफुल्ला उर्फ साजिद जट उर्फ अली उर्फ हबीबुल्ला उर्फ नुमान उर्फ लंगडा उर्फ नौमी, मोहम्मद कासिम आणि अबू कताल उर्फ कताल सिंधी अशी झाली आहे. अबू कटाल आणि साजिद जट्ट हे पाकिस्तानी नागरिक होते. कासिम २००२ च्या सुमारास पाकिस्तानात गेला होता आणि तिथे लष्कर दहशतवादी गटात सामील झाला होता.





