Murder Mubarak Trailer । मर्डर मिस्ट्रीमध्ये पाहायला मिळेल ‘कॉमेडीचा तडका’

Murder Mubarak Trailer । मर्डर मुबारकचा ट्रेलर रिलीज झालाय. अभिनेत्री सारा अली खान, करिश्मा कपूर, डिंपल कपाडिया, विजय वर्मा आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात कॉमेडीचाही जोरदार घटक आहे.
ट्रेलरची सुरुवात दिल्ली वन क्लबपासून होते, जिथे श्रीमंत लोक पार्टी करतात. यादरम्यान खून होतो. त्याची जबाबदारी एसीपी भवानी सिंग म्हणजेच अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भवानी सिंग प्रत्येकाची आपल्या शैलीत विचारपूस करतोआणि या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करू लागते. हे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्यामध्ये सस्पेन्स आणि थ्रिल दोन्ही आहे. पण त्याचबरोबर याला कॉमेडीचाही पूर्ण डोस देण्यात आला आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात सारा अली खान, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, विजय वर्मा, संजय कपूर आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा संगम आहे. याशिवाय टिस्का चोप्रा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.
हा चित्रपट 15 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. ‘मर्डर मुबारक’ हा सिनेमा अनुजा चौहानच्या ‘क्लब यू टू डेथ’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘मर्डर मुबारक’मधून करिश्मा कपूर बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. तर सारा अली खान दक्षिण दिल्लीतील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.





