‘मुरांबा’ मालिकेतील साध्या भोळ्या रमाचा हॉट लूक व्हायरल, यूजर्सचा कमेंटचा वर्षाव

Shivani Mundhekar Viral Photos : स्टार प्रवाह चॅनेलवरील मुरांबा या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील रमा आणि अक्षयचे पात्र साकारणारे कलाकार शिवानी मुंढेकर आणि शशांक केतकर हे घराघरात पोहोचले आहेत.
ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर असून, आतापर्यंत साधी भोळी वाटणारी रमा आता मॉडर्न लूकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यातच आता रमाचे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने ग्लॅमरस लूकमधील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, चाहत्यांकडून पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये रमाने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. रमाचा हा हॉट लूक बघून चाहतेही चकित झाले. या फोटोवर कमेंट्स करत एका यूजरने लिहिले की, ‘म्हणूनच रमाचा लूक बदलण्यात आला असावा.’ तर काहीं यूजर्सनी ‘खूपच सुंदर’ अशी कमेंट केली आहे.
मालिकेमध्ये आतापर्यंत शिवानीने दोन वेणी घालणारी, साधी-भोळी, सुंदर रमा हे पात्र साकारले आहे. मात्र, आता मॉर्डन माही म्हणून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रमाप्रमाणेच तिचा हा नवीन लूक प्रेक्षकांना आवडत आहे.





