Bal Karve passes away : ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे काळाच्या पडद्याआड; ९५ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bal Karve passes away : कलाविश्वातून एक दुःखत बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांच निधन झालं आहे. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. बाळ कर्वे यांचा तीन दिवसांपूर्वी ९५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता आणि आज त्यांच्या निधनाचं वृत्त आलं आहे.
बाळ कर्वे यांनी अनेक जुन्या सिनेमांमध्ये अभियन केला आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजनवरील मालिका विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटला. प्रेक्षकांनीही त्यांनी दखल घ्यायला भाग पाडलं. त्यांनी चिमणराव मालिकेत केलेली गुंड्याभाऊ ही भूमिका लोकांच्या मनात आजही घर करुन राहिली आहे. १९७९ च्या काळात चिमणराव गोंड्या भाऊ ही मालिका प्रसारित झाली होती.
कोण होते बाळ कर्वे?
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे हे रंगीभूमी, सिनेमा आणि मालिका विश्वातील त्या काळात नावाजलेल्या कलाकारांपैकी एक होते. त्यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० ला झाला होता. चिमणराव गोंड्या भाऊ या मालिकेत त्यांची गुंड्याभाऊंची भूमिका त्यांनी अजरामर केली. बन्या बापू सिनेमातील त्यांची बापूची भूमिका देखील विशेष गाजली. याशिवाय राज्य शासनाच्या पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
बाळ कर्वेंनी उंच माझा झोका, प्रपंच, महाश्वेता, वहिनीसाहेब, स्वामी या मालिकेत काम केलं होतं. आई रिटायर होतीये या नाटकासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. चैत रे चैत, लपंडाव या त्याकाळी गाजलेल्या सिनेमातही त्यांनी आपलं कामाची चूणुक प्रेक्षकांना दाखवून दिली.
हेही वाचा : “…तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करतील,” मनोज जरांगेंचा फडणविसांना इशारा





