पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विमानतळावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी कक्षाची पाहणी केंद्राचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. तसेच विमानतळावरील सुविधांचा व्यापक आढावा घेतला.
प्रवाशांना अखंड अनुभव मिळावा यासाठी त्यांनी विमानतळावर पुरवलेल्या आॅपरेशनल तयारी आणि सेवांचे मूल्यांकन केले. प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या.
तसेच वाढत्या प्रवासी वाहतुकीला सामावून घेण्यासाठी आणि एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुणे विमानतळावरील पायाभूत सुविधा आणि सेवेची गुणवत्ता वाढवण्याबाबत सूचना दिल्या.