मुन्नाभाई आणि पठाण येणार एकत्र ! ‘या’ चित्रपटासाठी करणार स्क्रिन शेअर

मुंबई – बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खानचा ‘पठाण’ या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ची हवा अजून लोकांच्या डोक्यातून उतरलेले नाही. पठाणचे भारतातच नाही तर जगभरातून कौतुक झाले. ‘पठाण’ नंतर शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवानमधील शाहरुखचा एक सिन नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटतात संजू बाबाची देखील एंट्री होणार आहे.
संजय दत्त जवानमध्ये दिसणार की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता, मात्र आता याची पुष्टी झाली आहे.शाहरुख खानच्या जवानमध्ये संजय दत्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये साऊथ आणि बॉलिवूड स्टार्सचा जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात संजूबाबा स्वतः गेस्ट अपिअरन्स करणार आहे.
संजय दत्त अनेकादा व्हिलनच्या भूमिका साकारताना दिसतो. यापूर्वी शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटाच्या शीर्षक गीतात संजय दत्त दिसला होता. संजय दत्त आणि शाहरुख हे दोघेही स्टार्स अनेकदा बॉलिवूड पार्टीजमध्ये एकत्र दिसून येतात. परंतु या दोघांना बड्या स्क्रिनवर पाहण्यासाठी आता चाहते देखील उत्सुक आहेत.
शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, संजय आणि शाहरुख व्यतिरिक्त यात विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोण सारख्या दमदार अभिनेत्री दिसणार आहेत. हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित करत आहेत.




