Raveena Tandon : प्रसिद्धीच्या काळात अनेक अॅाफर नाकारल्या; बॅालीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनने प्रसिद्धीच्या काळात काही चित्रपटांची अॅाफर नकारली होती, याबद्दलचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.
Raveena Tandon : बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) ही ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. पण तिने प्रसिद्धीच्या काळात अनेक चित्रपटांना नाकारही दिला होता. याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है या चित्रपटात तिला भूमिकेची अॅाफर होती, पण तिने नकार कळवला. त्यानंतर तिला प्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम यांच्या दिल से या चित्रपटात आयटम साँगसाठी विचारणा करण्यात आली होती. या अॅाफरलाही रवीनाने (Raveena Tandon ) नकार दिला होता. याबाबतचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
दिल से या चित्रपटातील “छैयाँ छैयाँ” या गाण्यात शाहरुखसोबत अभिनेत्री मलायका अरोरा झळकली होती. पण या गाण्यासाठी रवीनाला प्रथम विचारणा करण्यात आली होती. याबद्दल रवीना म्हणाली, ‘दिल से’ चित्रपटातील “छैयाँ छैयाँ” गाण्याची ऑफर करण्यात आली होती. तिला हे गाणे गाण्याची इच्छा होती, पण तिला आयटम गर्ल व्हायचे नव्हते, असा खुलासा तिने इतक्या वर्षांनी केला.
रवीनाने ही ऑफर नाकारल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोराने छैयाँ छैयाँ या गाण्यावर डान्स केला. शाहरुख खानसोबत झळकलेल्या मलायकाचा डान्स सगळ्यांच्याच काळजाचा धाव घेणारा ठरला. चित्रपटातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले.
रवीना टंडन “कुछ कुछ होता है” या चित्रपटात काम करणारी होती. पण तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. खरंतर रवीनाला या चित्रपटात राणी मुखर्जीची भूमिकेची ऑफर होती. रवीनाला वाटले की कदाचित ती या भूमिकेसाठी तयार नाही म्हणून तिने नकार दिला. यामागील कारण रवीनाने स्वतः सांगितले. तिला या चित्रपटात दुसरी भूमिका करायची नव्हती म्हणून तिने राणी मुखर्जीची भूमिका नाकारली.






