Preity Zinta : “प्रितीने शाहखरुच्या कानशिलात लगावली होती”; ‘कभी अलविदा ना कहना’च्या सेटवर घडलेला किस्सा म्हणाली “मी अभिनय क्षेत्रात…”
Preity Zinta : कभी अलविदा ना कहना चित्रपटाच्या चित्रीकरणाचा किस्सा अभिनेत्री प्रिती झिंटाने शेअर केला आहे.

Preity Zinta : बॅालीवूड इंडस्ट्रीतील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणून शाहरुख खान आणि प्रिती झिंटाकडे पाहिले जाते. काही मोजक्याच चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा बॅालीवूड इंडस्ट्रीपासून काहीशी लांब गेली आहे. पण तिने अनेक उत्तम चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत.
या दोघा कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील ३० वर्षांपेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीत घालवला आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा हिने शाहरुखसोबत एकत्र काम केलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा रंजक किस्सा शेअर केला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रितीने चक्क शाहरुखच्या कानशिलात लगावली होती.
प्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख आणि तिच्यासोबत घडलेला किस्सा शेअर केला आहे. ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली होती. प्रितीने शाहरुखला एक सीन शूट करताना कानशिलात लगावली होती. २००६ मध्ये करन जोहर याने दिग्दर्शित केलेला कभी अलविदा ना कहना हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. शाहरुख आणि प्रितीच्या अभिनयाचे कौतुक प्रेक्षकांनी केले.
या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी प्रितीने शाहरुखच्या कानशिलात का लगावली होती याविषयी अभिनेत्रीने खुलासा केला आहे.”मी खरोखरच शाहरुखच्या कानशिलात लगावली होती. मी मुद्दाम त्याच्या कानशिलात लगावली नव्हती. तो सीनचा एक भाग होता आणि सीन वास्तववादी वाटावा यासाठी शाहरुखनेच मला खरोखर कानशिलात लगावण्यासाठी सांगितलं होतं.” असा खुलासा प्रितीने केला आहे.
सीनविषयी बोलताना प्रितीने सांगितले की, ”हा हे खरं आहे मी त्याला मारलं. पण, मी अभिनय क्षेत्रात नवखी होते आणि कानशिलात मारायचा टायमिंग परफेक्ट कसा करावा हे मला कळत नव्हतं. त्यामुळे माझ्याकडून त्याला खरोखरच मारलं गेलं असल्याचे तिने सांगितले. पण, त्यानंतर मी पुन्हा अशी चूक कधीच केली नाही, असेही तिने स्पष्ट केले. या चित्रपटात प्रिती झिंटा, शाहरुख खान व्यतिरिक्त राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन अशी मोठी स्टारकास्ट झळकली होती.





