Munna Bhai MBBS Fame Actor : ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाला धडक; व्हिडिओ व्हायरल
Munna Bhai MBBS Fame Actor : अश्विन मुशरन, त्यांची पत्नी आणि नागरिक यांच्यात वाद

Munna Bhai MBBS Fame Actor : ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने एका दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना गोव्यातील मडगावमधील कुसमान, केपे येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. अश्विनच्या कारने बाईकला दिलेल्या धडकेत 2 जण जखमी झाले आहे.
रिपोर्ट्सनुसार, अश्विनच्या कारने एका दुचाकीला धडक दिली, ज्यावर एक बाप आणि मुलगा प्रवास करत होते. अभिनेत्यावर वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुचाकीवर बसलेल्या मुलांच्या वडीलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्तीचं हाडही मोडल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
अपघातानंतरचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या धडकेमुळे परिसरातील अनेक लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर अश्विन मुशरन, त्यांची पत्नी आणि नागरिक यांच्यात वाद झाला. स्थानिक नेते अमोल काणेकर हे त्या जोडप्याला जाब विचारणाऱ्या लोकांमध्ये होते, असे समजते. मात्र अपघाताला कारणीभूत ठरलेल्या नेमक्या परिस्थितीची अद्याप पडताळणी झालेली नाही.
दरम्यान, अश्विन मुशरनने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र लगे रहो मुन्नाभाई, फॅशन आणि संजू यांसारख्या चित्रपटांमुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. अलीकडेच तो ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटात पाहायला मिळाला होता.
हेही वाचा:





