Munmun Dutta : ‘तारक मेहता…’ मालिकेतून ‘बबिता जी’ झाली गायब? अभिनेत्रीची पोस्ट पाहून फॅन्स म्हणाले….

Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. लोकांना हा शो खूप आवडला आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
जेठालाल उर्फ दिलीप जोशी आणि बबिता जी उर्फ ‘मुनमुन दत्ता’ शो सोडत असल्याच्या बातम्या येत होत्या. मुनमुन दत्ताने शो सोडण्याच्या अफवांना पूर्णविराम दिला होता पण ती शोमध्ये दिसत नाही.
बबिताजी शोमध्ये दिसत नसल्याने त्यांचे चाहते चिंतेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मुनमुन दत्ताने ती कुठे आहे आणि काय करत आहे? याबद्दल अपडेट दिले आहे. सध्या तिची ही पोस्ट सगळीकडे चांगलीच व्हायरल होत आहे.
बबिता जी कुठे आहे? पाहा…
मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री थंडीचा आनंद घेत असल्याचं यातून दिसून येत आहे. तिने या फोटोंसह थंडी आणि स्नोमॅनचा इमोजी शेअर केला आहे.
View this post on Instagram
या फोटोंसह मुनमुन दत्ताने सांगितले आहे की, ती सहलीला गेली आहे आणि सुट्टीचा खूप आनंद घेत आहे. ‘एकाने लिहिले- बबिता जी खूप छान दिसत आहेत. तर दुसऱ्याने लिहिले- बबिता जी परत स्वागत आहे’. अश्या अनेक कंमेंट नेटकरी या पोस्टवर करत आहेत..
शो सोडल्याबद्दल प्रतिक्रिया?
काही काळापूर्वी मुनमुन दत्ता शो सोडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर मुनमुन दत्ताने प्रतिक्रिया दिली. तिने शोच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयार होताना दिसत होती. त्यानंतर तिने एक संवादही बोलला. ज्यामुळे तिचे चाहते खूप आनंदी झाले.
तुम्हाला सांगतो की, सध्या शोमध्ये एक भयपट भाग सुरू आहे. ज्यामध्ये भूत चकोरी हे पोपटलालशी लग्न करण्यासाठी त्याच्या मागे लागला आहे. शोमध्ये हास्याचे वातावरण आहे तसेच भीतीचेही वातावरण आहे.





