राज्यात आता लवकरच महापालिका निवडणूका लागणार ; लवकरच मोठा निर्णय होणार ?

Municipal elections । राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागला. या निवडणुकीत राज्यतील महायुतीने विरोधी असणाऱ्या महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान मिळवला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार Municipal elections ।
समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे. भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत काम Municipal elections ।
मागच्या काही वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





