पिंपरी | पालिका आयुक्तांच्या हस्ते नवनियुक्त पथविक्रेता समिती सदस्यांचा सत्कार

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरात प्रथमच पथविक्रेता समिती पदासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सत्कार करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समिती सदस्यांनी कामकाज सुरू करण्याची मागणी यावेळी केली.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्यपदी बहुमताने निवडून आले याबद्दल पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते, सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर,सदस्य प्रल्हाद कांबळे,सदस्य किसन भोसले, सदस्य अलका रोकडे,सदस्य सदस्य सलीम डांगे हे निवडून आले असल्याच्या प्रमाणपत्राचा स्वीकार केला.
सर्व सदस्य यांचे अभिनंदन करत आयुक्त शेखर सिंह यांनी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राजेश माने, सूरज देशमाने, सलीम हवालदार, बिलाल तांबोळी,वृषाली पाटणे, संभाजी वाघमारे, नंदू आहेर, बालाजी लोखंडे, दत्तात्रय जाधव, इरफान चौधरी, विजय जाधव, रवींद्र गायकवाड, अंबलाल सुखावाल आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सध्या आचारसंहिता सुरू असल्याने बैठक आयोजित करता येत नाही; मात्र आचारसंहिता संपल्यानंतर शहर पथविक्रेता समितीची बैठक घेऊन त्यांचे कामकाजास सुरुवात करण्यात येईल. सध्या दिवाळी व सणाचे दिवस असल्यामुळे शहरातील विक्रेत्यावरील कारवाई शिथिल करण्यात यावी, अशी सदस्यांनी मागणी केली.
निवडून दिल्याने आमची जबाबदारी वाढलेली असून, पुढच्या कालावधीमध्ये आम्ही विक्रेत्यांचे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू , असा विश्वास पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.





