Munawar Faruqui Mystry Girl । ‘बिग बॉस 17’चा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी त्याच्या अफेअर्स चर्चेत असतो.शोमध्ये समर्थ जुरेलने मुनावरला वूमनलायझर म्हणून देखील टॅग केले होते. या शोनंतर मुनव्वरच्या आयुष्यात काही मिस्ट्री गर्ल असल्याच्या चर्चा होत्या पण आता त्याने एक फोटो शेअर करून सर्वांना एक मेसेज दिला आहे.
अभिषेक कुमारच्या पार्टीत मुनव्वर एका मुलीसोबत दिसला होता. ती मिस्ट्री गर्ल मुनव्वरची प्रेयसी असल्याचे बोलले जात आहे. अशात मुनव्वरने आता त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. फोटोत दोघांचे फक्त हात दिसत आहेत. एवढेच नाही तर मुनव्वरने फोटोसोबत एक रोमँटिक गाणे देखील शेअर केले आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. मन्नाराला दाखवण्यासाठी तो अशा पोस्ट टाकत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काहींनी मुनव्वर यांच्या आयुष्यात नवीन मुलगी आल्याचे सांगितले.
हेही वाचा
Mithun Chakraborty Hospitalised। ‘मिथुन दा’ यांना ‘ब्रेन स्ट्रोक’; कोलकाता रुग्णालयात दाखल
मुनावर फारुकी बऱ्याच दिवसांपासून नाझिला सिताशीला डेट करत होता आणि शोमध्येही तो तिचा उल्लेख करत असे. त्यानंतर शोच्या मध्यभागी आयशा खान वाईल्ड कार्ड एन्ट्री मारली आणि मुनव्वरवर फसवणूक केल्याचा आरोप केला. यानंतर मुनव्वर आणि नाझिला यांचे फार पूर्वी ब्रेकअप झाल्याचेही समोर आले आहे. पण आयशाला डेट करताना तो नाझिलाशीही बोलत होता.