Mumbai Water Cutting : मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली.!
मान्सूनच्या विलंबाने झालेल्या आगमनामुळे मुंबईवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ६.९३ टक्क्यांवर घसरला आहे.

Mumbai Water Cutting – मान्सूनच्या विलंबाने झालेल्या आगमनामुळे मुंबईवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ६.९३ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये तब्बल ३९.५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
मुंबईला रोज ४,००० दशलक्ष लीटर पाणी पुरवणाऱ्या ७ धरणांची एकूण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लीटर आहे. सध्या त्यात केवळ १,००,२७९ दशलक्ष लीटर (६.९३%) पाणी उरले आहे.
भातसा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या सात धरणांपैकी अप्पर वैतरणा धरणातील उपयुक्त साठा शून्य झाला असून, तिथून मृत साठ्यातून पाणी उपसा केला जात आहे. (Mumbai Water Cutting)
संभाव्य एल निनोच्या चिंतेमुळे पालिकेने आधीच १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू केली आहे, तर १७ जूनपासून उद्योग आणि व्यावसायिक संस्थांसाठी ही कपात २० टक्के करण्यात आली आहे.
तथापि, गेल्या २४ तासांत तुळशी (१७९ मिमी) आणि विहार (११२ मिमी) धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून, पालिका प्रशासनाकडून धरणांमधील पाणीपातळीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.





