छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस RDX ने उडवणार; अज्ञाताच्या कॉलने उडाली खळबळ
Updated On:

मुंबई : मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आरडीएक्सने उडवून देण्याची धमकीचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. आज संध्याकाळी एका अनोळखी नंबरवरून हा कॉल आला.
हा कॉल आल्यानंतर जीआरपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना, बॉम्बशोधक पथकाला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीएसएमटीमध्ये शोध सुरू केला. दरम्यान, स्टेशनवर कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही.
पोलिसांकडून सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉलरचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपला मोबाईल बंद केल्याने मोबाईल ट्रेस होऊ शकला नाही. पोलीस कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.





