26/11 मुंबई हल्ल्याप्रकरणी मोठे यश, तहुव्वर राणाचे लवकरच होणार प्रत्यार्पण

Tahawwur Rana Extradition : 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेकडून भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी असलेला तहव्वूर राणावर 26/11 मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. राणाला भारतात आणण्यासाठी राजनैतिक माध्यमातून प्रक्रिया सुरू आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेतील न्यायालयाने दोन्ही देशातील प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारताकडे सोपवण्यात यावे, असा निकाल दिला होता. राणाने भारताकडे प्रत्यार्पणाचा विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली . भारताने राणाविरोधात सबळ पुरावे दिले असून, प्रत्यार्पणचा आदेश योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
मुंबई पोलिसांनी 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेज इंटेलिजन्स आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य म्हणून काम केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. त्याने या हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीची मदत केल्याचाही आरोप केला होता.
एफबीआयने 26/11 च्या हल्ल्यानंतर 1 वर्षानंतर राणाला शिकागोमध्ये अटक केली होती. राणानने डेव्हिड हेडलीसोबत मिळून मुंबई हल्ल्यातील ठिकाणांची रेकी केली होती.





